Friday, June 13, 2014

Mazi Kathapremi Kanya

माझ्या मुलीचा जन्म झाला आणि आमच्या घरात आनंदोत्सव सुरु झाला . घरातील प्रत्येकाला तिला कुठे ठेऊ आणि कुठे नको , असे झाले होते . दिसामासांनी ती वाढत होती आणि मी तिच्याशी बडबड करण्यात रंगून गेले होते . अचानक मला जाणवले की माझ्या गोष्टी तिला ऐकायला खूप आवडतात . मग मी मला माहित असलेल्या लहान मुलांच्या सर्व गोष्टींचा सपाटा लावला आणि तो सुद्धा हावभावासकट …करता करता ती तीन वर्षांची झाली आणि बोलायला पण लागली .. आता ती अमुक एक गोष्ट सांग अशी मागणी सुद्धा करू लागली होती . 
            कामावरून घरी येताना मी फुलबाग ,किशोर  अशी पुस्तके आणायला सुरवात केली . त्यातील गोष्टी वाचून दाखवणे हे एक नित्याचे काम होऊन बसले . त्यातील चित्र समजून सांगणे हे सुद्धा महत्वाचे ठरू लागले . शिवाय मी घरी नसताना घरातील आज्जी व आजोबाना पण ती पुस्तके तिला वाचून दाखवावी लागत . ती सहा वर्षांची झाली, पहिलीत गेली आणि मी तिला अमर चित्रकथा वगैरे सारखी पुस्तके आणू लागली.  चित्ररूप महाभारत ,रामायण ती आवडीने पाहू लागली ,ऐकू लागली ........

            ..... आणि एका रविवारी मी अतिशय कामात असताना ती माझ्याजवळ येउन मला म्हणाली ....आई ,मला वाचून दाखव ना …. पण मी तिला प्रेमाने सांगितले की तुला वाचता येते, तू आता एकटीच वाचून बघ…… मला आता काम आहे ,मी तुला नंतर वाचून दाखवेन . अहो आश्चर्यम !!!!!!… तिने खरोखर आज्ञा पालन करून स्वतः वाचायला सुरवात देखील केली होती . त्या दिवशी तिने मला गोष्ट वाचून समजावली . काही शब्द आणि चित्र यांच्या सहाय्याने ती गोष्ट सांगत होती . त्यानंतर तिने वाचनाचा सपाटाच लावला . मी वाचनालयातून पुस्तक आणायचे आणि तिने ते वाचून टाकायचे असा नियमच होऊन गेला . ……। 
                    अश्या तऱ्हेने माझ्या कथाप्रेमी कन्ये ने तिचे जीवन समृद्ध करून टाकले . …… 
   

No comments:

Post a Comment